आजीच्या बटव्यातली हळद, ओवा, लवंग... साध्या, घरगुती, पण किती बहुगुणी गोष्टी! आता कल्पना करा, असंच एक बटवा तुमच्या हातात असेल, जो तुमच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक अडचणीवर आधुनिक उपाय देईल. हाच आहे तुमचा 'AI चा बटवा'!
AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजे काय, याची तुम्हाला भीती वाटते का? ते काहीतरी अवघड, मोठमोठ्या वैज्ञानिकांचे काम आहे असं वाटतं का? तर थांबा! भावना आणि विवेक हे लेखक तुम्हाला हेच सांगायला आले आहेत की, AI म्हणजे काही जादू नव्हे, तर तो तुमचा एक नवा, स्मार्ट साथीदार आहे. हा बटवा तुम्हाला AI ची भीती घालवून, ते तुमचे मित्र कसे होऊ शकते हे शिकवेल आणि तुमच्या जीवनात त्याचा सहज वापर कसा करायचा हे सोप्या मराठी भाषेत समजावून सांगेल.
सोप्या भाषेत AI ची ओळख: AI म्हणजे काय, ते तुमच्या आजूबाजूला कुठे कुठे आहे, आणि ते तुमच्यासाठी का महत्त्वाचे आहे, हे हळदीच्या उपमेने समजावून सांगितले आहे.
प्रसिद्ध AI टूल्सची ओळख: ChatGPT, Google Gemini, Midjourney यांसारख्या प्रमुख AI साधनांची 'चव' घ्या आणि त्यांचे विविध उपयोग जाणून घ्या.
दैनंदिन कामांसाठी AI चे व्यावहारिक उपाय:
माहितीचा सुलभ वापर (ओवा): लांबलचक लेखांचा सारांश काढणे, अवघड संकल्पना सोप्या भाषेत समजून घेणे, भाषांतर करणे.
नवनिर्मिती आणि कल्पनांची वाढ (सुंठ): ईमेल, पत्रे, सोशल मीडिया पोस्ट लिहिणे, कथा-कविता तयार करणे, नवीन व्यवसाय किंवा घर सजावटीच्या कल्पना मिळवणे.
नियोजन आणि व्यवस्थापनात मदत (मिरी): वेळेचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, प्रवासाचे नियोजन कसे करायचे.
शिकणे आणि कौशल्य विकास (तुळस): AI ला तुमचा वैयक्तिक शिक्षक बनवून नवीन कौशल्ये शिकणे, मुलाखतीची तयारी करणे, शंकांचे निरसन करणे.
प्रभावी वापरासाठी युक्त्या (चिमूटभर मीठ): AI ला योग्य प्रश्न (Prompts) कसे विचारावे, ज्यामुळे तुम्हाला अचूक आणि अपेक्षित उत्तर मिळेल.
सुरक्षिततेची गुरुकिल्ली (कपभर पाणी आणि स्वच्छ बटवा): AI ने दिलेल्या माहितीची पडताळणी का करावी? 'Hallucination' आणि 'Deepfake' म्हणजे काय? तसेच, तुमची वैयक्तिक माहिती, खासगी फोटो (उदा. Gemini वर फोटो अपलोड करताना) AI सोबत शेअर करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दल सखोल मार्गदर्शन.
हे पुस्तक गृहिणी, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक, शिक्षक आणि AI ला समजून घेऊन त्याचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आहे.
आधुनिक जगात मागे राहू नका. तुमचा 'AI चा बटवा' उघडा आणि तंत्रज्ञानाला मित्र बनवून, जीवनात अधिक सक्षम होऊया!
AI Safety Tips Marathi, Digital Literacy Marathi, Artificial Intelligence for Beginners,
AI in Marathi: (मराठी भाषेत AI शिकण्यासाठी),#AIbook #MarathiReads #NewRelease #EbookLaunch #ArtificialIntelligence #LearnAI #TechForGood #aichabatva