सामान्य माणसाचे पोलिसांबद्दल, गुप्तचर यंत्रणांबद्दल असलेले मत बदलू लागले आहे. गुन्हेगारी जगताशी संबंधित काही निवडक कथांचा, थरार, शोध आणि तपासाचा हा 'क्राईम स्पॉट!' दिवाळी अंक यावर्षी पहिल्यांदा प्रकाशित होत आहे. या अंकात नामांकित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी (उदा. मधुकर झेंडे, इसाक बागवान, अजित डोवाल इ.) आणि मान्यवर लेखकांच्या सत्यकथा आणि रहस्यकथांचा समावेश आहे.